टाटाने सीएनजी मध्ये लाँच केलेल्या या दोन वाहनामध्ये दिलेले फीचर्स बघून लोक एक्सटर कॅन्सल करू लागले । Tiago & Tigor CNG

What’s new in the Tata Tiago and Tigor CNG 2023: टाटा मोटर्स ने आपल्या सर्व lineup मध्ये सीएनजी फीचर्स देण्यास सुरु केल्याने प्रतिस्पर्धी कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. पंच आणि अल्ट्रोज नंतर कंपनीने टियागो हॅचबॅक आणि टिगोर कॉम्पॅक्ट सेडानमध्ये ट्विन-सिलेंडर CNG सेटअप सादर केला आहे. हे मॉडेल्स मधील सीएनजी मध्ये उपलब्ध होते पण आता नवीन अद्ययावत फीचर्स आणि बूट स्पेस वाढविण्यासाठी ट्विन-सिलेंडर CNG सेटअप ऍड केला आहे ज्याने दोन्ही वाहन ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत.

Tata Tiago आणि Tigor 2023 अपग्रेडस

टाटा मोटर्स ने टियागो हॅचबॅक आणि टिगोर या दोन्ही मॉडेल्स ना iCNG या तंत्रज्ञानाने अपग्रेड केले असले तरी त्यामध्ये कोणते कोणते फीचर्स येतात हे ग्राहकांना प्रथमतः माहिती असायला हवे. आम्ही तुम्हाला सांगतो कि, टियागो हॅचबॅक आणि टिगोर दोन्ही वाहनात फक्त बूट स्पेस वाढवण्यात आला आहे या शिवाय या वाहनात कोणतेही सदृश्य बदल केलेलं नाहीत.

Tiago CNG ची किंमत रु. ६.५५ लाख आणि टिगोर सीएनजीची किंमत रु. 7.80 लाख (एक्स-शोरूम) इतकी आहे.टाटा मोटर्स कडे आता या नवीन ट्विन-सिलेंडर तंत्रज्ञानासह सीएनजी लाइन-अपमध्ये अल्ट्रोझ आणि पंचसह चार मॉडेल्स आहेत. Tiago आणि Tigor CNG वाहनांमध्ये नवीन काय आहे तेखाली नमूद केले आहे.

Tata Tiago आणि Tigor मॉडेल्सवर नवीन सिलेंडर सेटअप

दोन्ही मॉडेल्स मध्ये फक्त ट्विन-सिलेंडर सेटअप दिला आहे जो आपण प्रथम अल्ट्रोज या गाडीमध्ये पहिला होता. पूर्वी ६० लिटर चा एकच मोठा सिलेंडर बूट मध्ये बसवला असल्याने ग्राहकांना बॅग्स किंवा इतर सामान बूट मध्ये ठेवण्यास अडथळा येत असे पण आता कार निर्मात्या कंपनीने ६० लिटर टॅंक ला ३०-३० लिटर मध्ये डिव्हाइड केला असल्याने सीएनजी गाडी असून सुद्धा ग्राहकांना बूट स्पेस शी कॉम्प्रमैज करावे लागणार नाही.

टाटा टियागो आणि टिगोर सीएनजीमध्ये आता बूट स्पेस वाढवली आहे

टाटा मोटर्सने नवीन मॉडेल्समध्ये बूट स्पेस क्षमता निर्दिष्ट केलेली नाही. जुन्या सेटअपसह, Tiago चे बूट स्पेस 80 लिटरपर्यंत मर्यादित होते. त्याचप्रमाणे टिगोर सीएनजीमध्ये 205 लिटर बूट स्पेस होती. मात्र, नवीन सेटअपमुळे बूट स्पेस वाढली आहे.

टाटा टियागो आणि टिगोर सीएनजी पॉवरट्रेन

Tiago आणि Tigor CNG दोन्ही 1.2-लिटर, तीन-सिलेंडर पेट्रोल इंजिनने पाच-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी कनेक्टेड आहेत. पेट्रोल मोडमध्ये पॉवर आउटपुट 84bhp आणि 113Nm टॉर्कनिर्माण होते. दुसरीकडे, CNG मोडमध्ये, ते 72bhp आणि 95Nm पीक टॉर्क निर्माण करते.

Leave a Comment