Tata Punch EV: टाटा पंच इलेकट्रीक लवकरच येणार, किती रेंज आणि कधी येणार जाणून घ्या

Tata Punch EV: टिगोर आणि टिआगो इलेकट्रीक व्हर्जन लाँच केल्या नंतर टाटा मोटर्स आता आपल्या इलेकट्रीक लाईनअप मध्ये अजून एक इलेकट्रीक वेहिकल जोडणार असल्याची न्यूज नुकतीच बाहेर आली आहे. नेक्सन या मिनी एसयूव्ही ला इलेक्टरीफाय केल्या नंतर सर्वात लोकप्रिय एन्ट्री लेव्हल एसयूव्ही टाटा पंच लवकरच इलेकट्रीक अवतारात ग्राहकांना भेटायला येणार आहे. आजच्या या लेखात टाटा पंच ची बॅटरी, फीचर्स आणि रेंज चा तपशील सांगणार आहे.

Tata Punch EV: लाँच आणि फीचर्स तपशील

टाटा पंच चे सीएनजी व्हेरिएंट लाँच केल्या नंतर लागेचच इलेकट्रीक व्हर्जन कंपनी लाँच करणार आहे. मिळालेल्या माहिती नुसार पंच ev मध्ये सात इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, इलेक्ट्रिक सनरूफ आणि दोन स्पोक असणारे स्टेरिंग दिला जाईल. इलेकट्रीक पंच मध्ये केबिन च्या डिजाईन मध्ये बदल होणार असून सेंटर कन्सोल अद्ययावत केले जाईल. सध्या च्या ठिकाणी असलेला गिअर लिव्हर बदलून त्या ठिकाणी रोटरी ड्राइव्ह दिले जाईल. क्रूज कंट्रोल फिचर प्रत्येक ev मध्ये सोपं असल्याने पंच च्या स्टेरिंग व्हील वर कंट्रोल्स ऍड होणार आहेत. सेफटी च्या दृष्टीने या मॉडेल मध्ये 360-डिग्री कॅमेरा देखील मिळू शकतो.

टाटा पंच ईव्ही: बॅटरी पॅक तपशील आणि वैशिष्ट्ये

टाटा पंच चे अचूक बॅटरी तपशील रिव्हिल झाले नसले तरी आम्हाला विश्वास आहे कि इलेकट्रीक एसयूव्ही मध्ये टाटा ची अद्ययावत झीप्ट्रोन तंत्रज्ञान दिले असेल. यामध्ये पॉवर देण्यासाठी लिक्विड-कूल्ड बॅटरी आणि चाकांना गती देण्यासाठी एसी पर्मनंट मॅग्नेट सिंक्रोनस मोटर दिली असेल. सध्याच्या टिगोर मध्ये असलेले बॅटरी आणि मोटर फीचर्स पंच इलेकट्रीक मध्ये शेअर केल्याचे आपल्याला पाहायला मिळणार आहे.

टाटा पंच ईव्ही मध्ये  दोन बॅटरी पॅक चे ऑपशन्स दिले जाणार आहेत. २६ kwh चा लिथियम आयन बॅटरी पॅक दिला जाईल जो ३०० किमी ची रेंज प्रदान करेल आणि २९ kwh चा एक ऑपशन दिला जाईल ज्याने ३५० किमी ची रेंज एका चार्ज मध्ये ग्राहकांना मिळणार आहे.

झिपट्रॉन तंत्रज्ञानाने टाटा पंच अद्ययावत असेल. 3 फेज पर्मनंट मॅग्नेट सिंक्रोनस मोटरद्वारे 55 kW च्या पॉवर आउटपुट आणि 170 Nm च्या झटपट टॉर्कसह चालणाऱ्या शुद्ध इलेकट्रीक तंत्रज्ञानाने पंच सुसज्ज असेल.

Leave a Comment