टाटाची एसयूव्ही सह दोन कार सीएनजी अवतारात करणार लाँच; नाव जाणून व्हाल खुश । Tata Punch CNG

Tata Punch CNG – टाटा मोटर्स, ह्युंदाई च्या नुकत्याच लाँच झालेल्या एक्सटर या गाडीला अव्हान देण्यासाठी पंच या एन्ट्री लेव्हल एसयूव्ही मध्ये सीएनजी इंधन ची सुविधा देणार आहे. कंपनी ४ ऑगस्ट २०२३ रोजी पंच या मायक्रो एसयूव्ही मध्ये ट्वीन सिलेंडर सीएनजी टेक्नोलोंजी सह सर्व व्हेरिएंट सादर करणार आहे.

तुम्ही या दिवाळी किंवा दसऱ्याला उत्तम सीएनजी कार विकत घेण्याचा विचार करत आहेत तर तुमच्या साठी बाजारपेठेत टाटा कंपनी कडून येणारी रगिड आणि ५ स्टार सेफटी असणारी पंच ४ ऑगस्ट रोजी सादर करण्यात येणार आहे. भारतीय बाजारपेठेत ह्युंदाई ने एक्सटर हि एन्ट्री लेव्हल एसयूव्ही सीएनजी व्हेरिएंट मध्ये नुकतीच लाँच केली आहे, हि गाडी भरपूर फीचर्स आणि सन रूफ ऑपशन सह उपलब्ध आहे. एक्सटर ला तगडे आव्हान देण्यासाठी आणि  भारतातील ग्राहकांची सन रूफ आणि सीएनजी प्रति असणारे प्रेम पाहता टाटा पंच सीएनजी सोबत सन रूफ ऑपशन  देईल.

Tata Punch या गाडीची सध्या क्रेज आहे. फाईव्ह स्टार सेफटी आणि दमदार इंजिन परफॉर्मन्स या मुळे हि गाडी प्रत्येक महिन्यात ८ ते १० हजार युनिट्स मध्ये विकली जाते.

टाटा मोटर्स च्या सोशल मीडिया अकॉउंट वर टाटा पंच आणि इतर २ वाहन टीज करण्यात आली आहेत. टाटा पंच सीएनजी ची झलक दाखवणारा हा विडिओ सध्या तुफान वायरल होत आहे. या टीजर नुसार टाटा पंच मध्ये दोन सीएनजी सिलेंडर आणि भरपूर बूट स्पेस असल्याचे दिसते आहे. टाटा पंच जरी सीएनजी मध्ये लौंच होत असेल तरी बूट मध्ये भरपूर स्पेस मिळणार आहे.

काय आहे ट्वीन सिलेंडर तंत्रज्ञान?

उपलब्ध माहिती नुसार पंच सह टिआगो आणि टागोर हे तीन मॉडेल्स ट्वीन सिलेंडर तंत्रज्ञान सह लाँच आहेत. टाटा आता आपली ट्वीन सिलेंडर टेक्नोलोंजि टिआगो आणि टागोर या उपलब्ध करून देणार असल्याचे कळते. ट्वीन सिलेंडर तंत्रज्ञान म्हणजे सीएनजी इंधन साठवण्यासाठी भल्यामोठ्या १ सिलेंडर ऐवजी दोन छोटे सिलेंडर उपलब्ध करून देणे. या तंत्रज्ञानामुळे बूट स्पेस मध्ये सिलेंडर कॉम्पॅक्ट साईज मध्ये बसतात आणि सामान ठेवण्यासाठी स्पेस हि भरपूर मिळतो.

टाटा पंच सीएनजी

टाटा पंचमध्ये 1 पेट्रोल इंजिन ऑफर आहे. पेट्रोल इंजिन 1199 cc आहे. हे मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे. व्हेरिएंट आणि इंधन प्रकारावर अवलंबून पंचचे मायलेज 20.09 kmpl आहे. पंच ही 5 सीटर 3 सिलेंडर कार असून तिची लांबी 3827 मिमी, रुंदी 1742 आणि व्हीलबेस 2445 आहे. सीएनजी मध्ये हि कर अपडेट केल्या नंतर हेच इंजिन 76BHP पॉवर आणि 97NM पीक टॉर्क जनरेट करेल.

टाटा पंच सीएनजी मायलेज (ऍव्हरेज)

उपलब्ध माहिती नुसार टाटा पंच सीएनजी मॉडेल मध्ये १ किलो ला ३० किलोमीटर चे arai क्लेम मायलेज मिळेल. हे मायलेज ड्राइवर आणि रोड वर अवलंबून असेल.

Tata Punch CNG Features

वैशिष्ट्यांच्या बाबतीत, Tata Punch SUV ला 7 इंची टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम मिळते, त्यात अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले, कनेक्टेड कार टेक, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, हरमन साउंड सिस्टम, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, क्रूझ कंट्रोल आणि कीलेस एंट्री आहे. पुश बटण स्टार्ट सह. प्रवाशांची सुरक्षा साठी ड्युअल एअरबॅग्ज, EBD सह ABS आणि पार्किंग कॅमेरासह मागील पार्किंग सेन्सर दिले जाईल. ग्लोबल NCAP सुरक्षा चाचण्यांमध्ये पंच ने 5-स्टार रेटिंग मिळवण्याची कामगिरी आहे.

Leave a Comment