Ola Electric S1 Air in Maharashtra – ओला इलेकट्रीकची नवीन बजेट स्कूटर Ola S1 Air ची नुकतीच खरेदी विंडो सुरु करण्यात आली होती. कंपनीचे सीईओ भविष्य अगरवाल यांनी काही महिन्यांपूर्वी या गाडीचे अनावरण करून लवकरच डिलिव्हरी करू असे अश्वशन दिले होते परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे कंपनीने या महिन्यात खरेदी विंडो खुली केली आणि फक्त एका तासात तब्ब्ल ३००० स्कूटर विकल्या गेल्या. भविष्य अगरवाल आणि manufacturing टीम या तुफान मिळालेल्या प्रतिसादामुळे गोंधळून गेल्या असल्याचे स्वतः अगरवाल यांनी सांगितले.
3000! I’m also heading to the factory now 😳 https://t.co/q89piwCOfA
— Bhavish Aggarwal (@bhash) July 27, 2023
स्वस्त आणि भरपूर फीचर्स असणारी ओला एस वन एअर ची इंट्रोड्युक्टरी किंमत रु. 1,09,999 आहे. हि किंमत जुलै २०२३ पर्यंत वालिद असून या कालावधीत बुकिंग केलेल्या प्रत्येक ग्राहकाला हि गाडी फक्त १ लाख १० हजार रुपयांच्या किमतीत मिळेल परंतु जे ग्राहक १ ऑगस्ट पासून पुढे बुक करतील त्यांना हीच किंमत १० हजारांनी वाढलेली दिसेल. जर तुम्ही सुद्धा Ola S1 Air या इलेकट्रीक गाडीची खरेदी करण्याचा विचार करत आहेत तर हीच तुमच्यासाठी योग्य संधी असेल.
टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि मागील ड्युअल शॉकअब्जोबर्स , ड्रम ब्रेक, केळीच्या आकाराच्या Ola S1 आणि S1 Pro बॅटरीपेक्षा वेगळे बॅटरी युनिट आणि 4.5 kW सह मागील हब मोटरच्या स्वरूपात काही खर्चात कपात केली गेली आहे. (6 bhp) आणि त्याच्या टचस्क्रीन युनिटसह काही युक्त्या आणि प्रमुख वैशिष्ट्यांचा अभाव या वाहनात दिसतो.
वाचा – ओकिनावा ने केली नवीन गाडी लाँच मिळणार २२ हजार सबसिडी…! वाचा संपूर्ण
Ola S1 Air एक 3 kWh बॅटरीच्या स्वरूपात आहे ज्याची रेंज 125 किमी आहे आणि टॉप स्पीड 90 किमी/तास आहे. ही स्कूटर त्याच्या प्रमुख प्रतिस्पर्ध्यांपेक्षा चांगले फीचर्स पप्रदान करते यामध्ये टचस्क्रीन डॅशबोर्डसह अँप बेस फीचर्स दिले आहे. ओला इलेक्ट्रिक मध्ये वेग वेगळे 6 रंग निवडीची सोय आहे.
ओला इलेक्ट्रिक एअर सहा रंग निवडी देत आहे या मध्ये स्टेलर ब्लू, निऑन, पोर्सिलेन व्हाइट, कोरल ग्लॅम, लिक्विड सिल्व्हर आणि मिडनाईट ब्लू आहेत. जरी S1 Air ने S1 Pro चे 12 रंगाचे काही पर्याय गमावले असले तरी तरीही हे आकर्षक दिसतात.