ओकिनावा ने केली नवीन गाडी लाँच मिळणार २२ हजार सबसिडी…! वाचा संपूर्ण

Okinawa Okhi 90 in maharashtra – गेल्या वर्षी लाँच झालेली Okinawa कंपनीची Okhi 90 आठवतेय का? हि गाडी नवीन फीचर्स आणि सरकारच्या सर्व अटी आणि नियमांचे पालन करून पुन्हा एकदा लाँच करण्यात आली आहे त्यामुळे Okhi 90 ला आता सबसिडी सुद्धा दिली जाणार आहे..

Electric two-wheeler manufacturer. Okinawa Autotech ने गेल्या काही दिवसांपूर्वी OKHI-90 चे नवीन अपडेटेड मॉडेल लाँच केले आहे. जे मॉडेल अधिक चांगल्या राईड कम्फर्ट सोबतच AIS-156 Amendment 3 – compliant battery pack, नवीन जनरेशनची इम्प्रोव encoder-based मोटर आणि अँप बेस फीचर्स दिले आहेत त्यामुळे गाडी पहिल्याच्या तुलनेत अधिक पॉवरफुल आणि मेंटेनन्स फ्री झाली आहे.

नवीन मोटर हि इटली च्या एका कंपनीशी भागेदारी करत इन होऊस डेव्हलप केली आहे ज्यामुळे मोटर ची durability वाढली असून टेम्परेचर कंट्रोल होईल आणि दीर्घ काळ उत्तम परफॉर्मन्स मिळेल. बॅटरी सुद्धा भारतातच डेव्हलोप केली आहे आणि सरकारचे बॅटरी साठी असणारे नियम सुद्धा हि बॅटरी पूर्ण करते..

डॅशबोर्ड डिस्प्ले वर आता रियल टाइम soc म्हणजे स्टेट ऑफ चार्ज ची योग्य माहिती मिळेल. सामान्य भाषेत सांगायचं तर बॅटरी किती टक्के चार्ज आहे अजून किती किमी प्रवास करू शकता याची माहिती मिळेल.. बॅटरी ला नॉर्मल चार्जर ने चार्ज होण्यासाठी ६ तास लागतात .

या व्यतिरिक्त कलर डिस्प्ले. geo फेन्सिंग.. live लोकेशन मॉनेटरिंग. रिमोट ऑपरेटेड फिचर. टूर्न बाय टर्न नेव्हिगेशन या सारखे अँप शी निगडित असणारे फीचर्स दिले आहे.. गाडीमध्ये बरेच फीचर्स पूर्व सारखेच आहेत.. बॅटरी मोटर आणि डिस्प्ले मध्ये बदलावं केला आहे..

वाचा – १ लाखांत ई स्कूटर घेण्यासाठी ओला इलेकट्रीकच्या शोरूम समोर ग्राहकांच्या रांगा..!

okhi ९० मध्ये ग्लॉसी ऐश ग्रे, ग्लॉसी ज्वेलरी ब्लू, ग्लॉसी पर्ल व्हाईट, ग्लॉसी वाईन रेड असे ४ कलर दिले आहेत. detachable ३.६ kwh ची लिथियम आयन बॅटरी दिली आहे ज्याने १६० किमी ची सर्टिफाईड रेंज कंपनी क्लेम करते पण एक लक्ष्यात घ्या कि हि रेंज arai certified रेंज आहे जी नॉर्मल कंडिशन मध्ये टेस्ट केली जाते पण रोजच्या वापरात १२० ते १३० किलोमीटर पर्यंत रेंज मिळू शकते..

okhi ९० या स्कूटर मध्ये सेंटर माऊंट बेल्ट ड्राइव्ह ३८०० वॅट पीक पॉवर निर्माण करणारी ip ६५ रेटेड मोटर दिली आहे त्यामुळे इव्ही ८० ते ९० चे टॉप स्पीड अचिव्ह करते. दोन रायडींग मोडस दिले आहेत.. १६ इंच टायर. पुढे आणि पाठीमागे डिस्क ब्रेक, डिकी मध्ये चार्जिंग सॉकेट, डबल सस्पेन्शन.. असे फीचर्स असतील. गाडीवर ३० हजार किमी किंवा ३ वर्षाची वॉरंटी दिली जाईल. okhi ९० ची सध्या एक्स शोरूम किंमत १ लाख ८६ हजार रुपये आहे.. यावर सरकारची फेम २ सबसिडी २२००० लागू होईल. तरी देखील हि गाडी महाराष्ट्रात १ लाख ६४ हजार रुपये एक्स शोरूम किमतीत उपलब्ध असेल.

Leave a Comment