MG Gloster: फॉरचुनर ला टक्कर देणार एमजीची हि गाडी 6.20 लाख रुपयांनी महागली

MG Gloster SUV: MG Motor India ने टोयोटा फॉर्च्युनर ला तागडे आव्हान देण्यासाठी Gloster SUV ला भारतात लाँच केले होते. उत्तम डिजाईन आणि परफॉर्मन्स च्या जोरावर भारतीय मार्केट मध्ये आपली छाप पडण्यास एमजी ग्लोस्टर मागे पडली पण कंपनी एमजी ग्लोस्टर मध्ये जे फीचर्स प्रदान करते ते इतर कोणत्याही ब्रॅण्ड्स ना देणं अशक्य असत. एमजी ग्लोस्टर मध्ये असलेले ऍडव्हान्स फीचर्स आणि कमी किंमत याच्या जोरावर या एसयूव्ही ची चांगली विक्री होत होती पण वाढलेल्या किमती मुळे याला ब्रेक लागल्याचे चित्र उभे राहू शकते.

एमजी ग्लोस्टरच्या किमतीत वाढ

MG Motor India ने Gloster SUV च्या किमती 6.20 लाख रुपयांनी वाढवल्या आहेत. नवीन किमती, ज्या तत्काळ  लागूझाल्या आहेत, परिणामी एंट्री-लेव्हल मॉडेलच्या किमती आतापासून 38.80 लाख (एक्स-शोरूम) सुरू होत आहेत.

ग्लोस्टर मॉडेल्स आणि व्हेरिएंट्स नुसार किंमत

ग्लोस्टरच्या बेस-स्पेक शार्प 7S 2.0 टर्बो 2WD व्हेरिएंटच्या किमतीत तब्ब्ल 6.20 लाख रुपयांनी वाढ झाली आहे हि सर्वात लक्षणीय वाढ झाली आहे. Savvy 2.0 Twin Turbo 4WD व्हेरियंट सहा-सीट आणि सात-सीटऑपशन्स चे मॉडेल 1.38 लाख रु.ने महागले आहेत, तर 2WD आवृत्त्यांचे प्रीमियम रु. 1.34 लाख ने वाढले असल्याचे समोर आले आहे.

एमजी ग्लोस्टर नवीनतम अपग्रेडस

या वर्षी मे महिन्यात MG ने Gloster Blackstorm Edition देशात सादर केली, ज्याच्या किमती 40.30 लाख रु. पासून सुरू झाल्या. त्याच वेळी, ब्रँडने ग्लोस्टर लाइन-अपमधून एंट्री-लेव्हल सुपर व्हेरिएंट बंद केले.

Leave a Comment