अवघ्या 10 लाखात मिळत आहे मारुतीची रगिड SUV; जाणून घ्या फीचर्स । Maruti Grand Vitara

Maruti Grand Vitara: मारुती सुझुकीने ग्रँड व्हिटारा ही कंपनीने नुकतीच काही महिन्या पूर्वी लॉन्च केलेली एक मध्यम आकाराची एसयूव्ही आहे. ही कार मारुती सुझुकीच्या ग्लोबल-सी प्लॅटफॉर्मवर आधारितअसली तरी ती Toyota Urban Cruiser Hyryder सोबत हा प्लॅटफॉर्म शेअर करते. दोन्ही एसयूव्ही एकाच वेळी लाँच करण्यातआल्या आहेत. मारुती सुझुकी ग्रँड विटारा अधिकृतपणे भारतीय कार बाजारात  अवघ्या ₹10.45 लाखांच्या सुरुवातीच्या किंमतीत लॉन्च करण्यात आली आहे.

ग्रँड विटारा भारतातील ऑटोमेकरचा पहिला स्ट्रॉंग हायब्रिड पर्याय आहे आणि टोयोटा अर्बन क्रूझर हायराइडर नंतर  दुसरी स्ट्रॉंग-हायब्रिड मध्यम आकाराची SUV आहे. कंपनीने माईल्ड हायब्रीड व्हेरिएंट चा पर्याय सुद्धा उपलब्ध करून दिला आहे.

ग्रँड व्हिटारा मध्ये मिळणारे बेस्ट फीचर्स, उत्तम मायलेज आणि दमदार पॉवर या मुले हि कार बाजारात मोठ्या प्रमाणावर विकली जात आहे. तुम्ही सुद्धा १० लाखांत फॅमिलीसाठी नवीन मिड साइज एसयूव्ही कार खरेदी करण्याचा विचार करत आहेत तर Maruti Grand Vitara व्यतिरिक्त दुसरी कोणतीच गाडी इतके बोल्ड फीचर्स कमी किमतीत देऊ शकत नाही.

Maruti Grand Vitara: पॉवरफुल इंजिन

Maruti Grand Vitara या लोकप्रिय एसयूव्ही मध्ये मध्ये दोन इंजिन पर्याय उपलब्ध आहेत: एक 1.5L पेट्रोल इंजिन आणि एक 1.5L हायब्रिड पेट्रोल इंजिन. नुसते पेट्रोल इंजिन 102 BHP आणि 136.8 Nm टॉर्क जनरेट करते, तर हायब्रिड पेट्रोल इंजिन 114 BHP आणि 141 Nm टॉर्क जनरेट करते. कारमध्ये 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन उपलब्ध आहे.

बोल्ड फीचर्स

Maruti Grand Vitara मध्ये अनेक नवीन फीचर्स आहेत, ज्यात LED हेडलाइट्स, एलईडी टेललाइट, 17-इंच अलॉय व्हील्स, 7-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, 6-स्पीकर ऑडियो सिस्टम, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, पावर विंडो आणि डोर लॉक्स, पावर स्टीयरिंग, पावर अँड वेंटिलेटेड सीट्स, रियर पार्किंग सेंसर, रियर व्यू कॅमेरा, हिल होल्ड कंट्रोल आणि व्हीइकल स्टॅबिलिटी कंट्रोल यांचा समावेश आहे.

वाचा – Kms or Age: सेकंड हॅन्ड गाडी घेताना काय महत्वाचे असते? जाणून घ्या थोडक्यात..!

मारुती सुझुकीने ग्रँड व्हिटारा: किंमत

Maruti Grand Vitara ही एक चांगली एसयूव्ही आहे जी अनेक फीचर्स आणि एक आकर्षक डिझाइन ऑफर करते. ही कार कुटुंबांसाठी आणि व्यवसायांसाठी एक उत्तम पर्याय आहे.

Maruti Grand Vitara ची सुरुवातीची किंमत ₹10.45 लाख आहे आणि टॉप व्हेरिएंट २० लाख रुपया पर्यंत जाते. मारुती सुझुकीने ग्रँड व्हिटारा हि एसयूव्ही 6 वेगवेगळ्या व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे ज्यामध्ये Sigma, Delta, Zeta, Alpha, Zeta+ आणि Alpha+ असे पर्याय देण्यात आले आहेत. तुमच्या बजेट आणि आवडी नुसार कोणतेही मॉडेल तुम्ही अधिकृत डिलरशिप ला भेट देऊन किंवा ओंलीने पद्धतीने बुक करू शकता.

Leave a Comment