धक्कादायक: मारुती सुझुकीने 87 हजार गाड्या परत मागवल्या, फ्री मध्ये बदलून देणार..!

मारुती सुझुकी भारतातील अग्रगण्य ऑटोमोबाईल कंपनी असून कंपनीच्या 87,599 गाड्यांमध्ये दोष आढळून आल्याने कंपनीने रिकॉल केला आहे.

मारुती सुझुकी ने 2023 मध्ये वाहन रिकॉल करण्याची ही तिसरी वेळ असून या पूर्वीही अनेक वाहनात सदोष असल्याने रिकॉल केल्याची माहिती मिळते आहे.

भारतातील भरोश्याची आणि नंबर 1 पोजिशन वर असलेली वाहन विक्रेता कंपनी मारुती सुझुकि वर एक नामुष्की ओढवलेली आहे. कंपनीला इको (Eeco) आणि एस्प्रेसो (S-presso) या वाहनातील मैनुफॅक्चरींग दोषामुळे 87 हजार वाहन परत बोलवावी लागली आहेत. कंपनीने नुकतीच याची अधिकृत घोषणा केली असून सदोष वाहनांना सुझुकीचा अधिकृत सर्व्हिस सेंटरला भेट द्यावी लागणार आहे. निघालेल्या सर्कुलर प्रमाणे इको (Eeco) आणि एस्प्रेसो (S-presso) मधील सर्व खराब पार्टस वाहन मालकांना मोफत दुरुस्त करून दिले जाणार आहे.

वाचा – स्वस्त ओला इ स्कूटर खरेदी करण्याची शेवटची संधी, १० हजार वाचवायचे असतील तर वाचा..!

कोणत्या पार्ट मध्ये आहे संभाव्य दोष?

सुझुकी च्या सर्कुलर प्रमाणे मारूती सुझुकीने 5 जुलै 2021 ते 15 फेब्रुवारी 2023 दरम्यान विकली काही ठराविक बॅच मधील वाहन रिकॉल केली असून स्टीयरिंग टाय रॉडच्या भागामध्ये असलेल्या मैनुफॅक्चरींग डिफेक्ट मुळे 87,599 एसप्रेसो आणि इको यांना रिकॉल दिला आहे.

जर तुमच्या कडे असलेली कर संगितलेल्या वर्षात बनलेली असेल तर लगेचच मारुती सुझुकीच्या अधिकृत डीलर वर्कशॉपला भेट द्या जेणे करून तुम्हाला लगेचच गाडीतील सदोष पार्ट बदलून मिळेल.

हे 2023 मधील तिसरे रिकॉल आहे.

पहिल्या वेळेस जानेवारी महिन्यात, मारुती सुझुकीने आपली वाहने परत मागवली होती. त्यानंतर त्यांनी अनेक वेळा वाहनां परत मिळवण्याच्या प्रक्रियेचा वापर केला. यापूर्वीच एप्रिल महिन्यात दुसरी रिकॉल जारी केली होती, ज्यामुळे 7,213 वाहनांसाठी परत बोलवल्या गेल्या होत्या. 2023 साली सुरू झालेल्या वर्षात एका मोठ्या रिकॉलमध्ये, जून महिन्यात 87,599 वाहनांसाठी तिसरी रिकॉल जारी केली गेली होती, ज्यामुळे ती महत्वाची घटना बनली.

मारुती सुझुकीने ह्या प्रक्रियेतून जुन्या वाहनांचे परत मिळवणे त्यांच्या ग्राहकांसाठी महत्वाचं आहे. रिकॉलसाठीचं अधिक वापर दरम्यानी आपल्या ग्राहकांसाठी नवीनतम आणि सुरक्षित तंत्रज्ञान तसेच पारंपारिक सेवा प्रदान करण्याचं मारुती सुझुकीचं ध्येय आहे. ही संख्या स्पष्टपणे दर्शविते की कंपनी साठी संगणकीचं वापर अत्यंत फायदेशीर असल्याचं दिसते.

का करतात रिकॉल?

अनेक ऑटोमोबाईल कंपन्यांनी आपल्या कार रिकॉल केल्याचे तुम्ही अनेकदा वाचले किंवा ऐकले असेल. एखादी कार फॅक्टरी मध्ये बनत असताना वेग वेगळ्या वेंडर कडून गाडीचे पार्ट निर्माण करून घेतले जातात आणि हेच पार्ट गाडीला जोडून एक कार बनते. कंपनी, मागणी पूर्ण व्हावी यासाठी वेगवेगळ्या वेंडर कडून पार्ट मगवते तेव्हा ठराविक पार्ट मध्ये तांत्रिक बिघाड असू शकतो. हे खराब पार्टस खराब आहेत हे गाडीमध्ये लावल्यावर न समजता ग्राहक काही दिवस गाडी वापरू लागल्यावर समजते. कंपनीकडे वारंवार तक्रार यायला लागल्यावर कंपनी सुनिश्चित करते की तो ठराविक पार्ट कोणत्या वेंडर कडून घेतला आहे आणि त्याच्या सिरियल नंबर नुसार सर्व गाड्यांना दुरुस्ती साठी परत बोलवले जाते.

Leave a Comment