स्वस्त ओला इ स्कूटर खरेदी करण्याची शेवटची संधी, १० हजार वाचवायचे असतील तर वाचा..!

२७ जुलै २०२३ नंतर ३१ जुलै २०२३ या दिवशी ओला इलेक्ट्रिक च्या एस १ एअर या बजेट ई स्कूटर ची खरेदी विंडो सुरू होणार आहे आणि १ लाख २० हजार रुपये किंमत असणाऱ्या गाडीस १ लाख १० हजार रुपयांत खरेदी करण्याची हि शेवटची संधी ग्राहकांना दिली जाणार आहे.

ओला इलेक्ट्रिकने ट्विटर द्वारे  अधिकृत घोषणा केली आहे की ते 31 ऑगस्ट रोजी S1 एअरसाठी खरेदी विंडो उघडतील. तथापि, S1 कम्युनिटी आणि राखीव लोकांसाठी, खरेदी विंडो आधीच उघडली होती. Ola S1 ची एक्स-शोरूम किंमत ₹1.20 लाख आहे. याशिवाय ओला इलेक्ट्रिकने S1 मॉडेल बंद केले आहे त्यामुळे आता फक्त S1 Air आणि S1 Pro विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. S1 एअर बद्दल तुम्हाला जे काही माहित असणे आवश्यक आहे ते येथेखाली दिले आहे ते तुम्ही वाचू शकता.

Ola S1 Air: बॅटरी आणि रेंज

S1 Air च्या बॅटरीची खसमात 3 kWh आहे आणि स्कूटर सोबत आलेल्या पोर्टेबल चार्जरद्वारे पूर्ण चार्ज होण्यासाठी 5 तास लागतील. ओला दावा करत आहे  एका चार्जवर 125 किमीची राइडिंग रेंज हि ई स्कूटर प्रदान करेल.

Ola S1 Air: कामगिरी

ओला इलेक्ट्रिक 4.5 kW ची इलेक्ट्रिक बीएलडीसी मोटर वापरत आहे जी चाकाच्या हबवर बसवली आहे. हि मोटर 3.3 सेकंदात 0 ते 40 किमी प्रतितास वेग वाढवू शकते तर 60 किमी ताशी 5.7 मध्ये वाढवते. स्कूटरचा टॉप स्पीड 90 किमी प्रतितास आहे आणि इको, नॉर्मल आणि स्पोर्ट्स या तीन राइडिंग मोडसह येते.

Ola S1 Air: हार्डवेअर

ओला S1 एअरवरील सस्पेन्शन समोरच्या भागात टेलेस्कोपिक आणि मागील बाजूस ड्युअल शॉकर दिले जाते. ब्रेकिंग सेटअपमध्ये खर्च कमी करण्यासाठी डिस्क ऐवजी ड्रमचा समावेश केला आहे. समोर तसेच मागील बाजूस ब्रेक हे कॉम्बी पद्धतीचे असतील  याशिवाय कंपनीने या गाडीत फ्लॅट डिझाइनमध्ये फ्लोअरबोर्ड बदलला आणि आता मागील ग्रॅब रेल पाईप चे दिले आहेत. चाकां मध्ये ऑलोय ऐवजी स्टील रिम्स दिल्या गेल्या आहेत.

वाचा – १ लाखांत ई स्कूटर घेण्यासाठी ओला इलेकट्रीकच्या शोरूम समोर ग्राहकांच्या रांगा..!

वाचा – ओकिनावा ने केली नवीन गाडी लाँच मिळणार २२ हजार सबसिडी…! वाचा संपूर्ण

ओला एस1 एयर:खासियत

Ola S1 Air मध्ये ७ इंच चा टच स्क्रीन डॅशबोर्ड दिला आहे ज्याचे रंजुलेशन 800 x 840 पिक्सेल इतके आहे. या गाडीमध्ये क्रूज़ कंट्रोल, प्रॉक्सिमिटी अनलॉक, कॉल अलर्ट सारख्या फीचर्स ना ऍड करण्यात आले आहे. पार्टी मोड, नेविगेशन, वेकेशन मोड, डिजिटल चावी, दस्तावेज़ फोल्डर, प्रोफ़ाइल और मूड चेंज करण्याचे ऑपशन्स दिले आहेत.

Leave a Comment