सबसिडी कमी झाली तरी १ लाखात मिळणार अथर ची नवीन गाडी…!

तुमचे. इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचे बजेट १ लाख रुपये आहे. त्यामध्ये तुम्हाला ब्रांडेड कंपनी हवी असते, चांगले फीचर्स हैवे असतात आणि सर्वात महत्वच म्हणजे स्कूटर ची चांगली रेंज हवी असते पण मार्केट मध्ये तुमच्या बजेट नुसार बघायला गेला तर चायनीज कचराच दिसतो. १ लाखात ओला एस १ एअर स्कूटर येते पण रेंज खूप कमी मिळते असे घ्रहक म्हणतात. मग तुम्ही सरळ ऍक्टिवा किंवा ज्युपिटर घेता आणि तुमचं ev घेण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहून जात पण. अथर तुमच्यासाठी व रोड एक लाख रुपयांत दमदार आणि फिचर रिच गाडी घेऊन येत आहे.

Ather 450s: नवीन मोडेल असेल खास

अथर हा एक प्रीमियम ब्रँड आहे. सध्या कंपनीकडे कडे ४५०x बेस आणि ४५०x प्रो हे दोन मॉडेल्स आहे याआधी एक प्लस हे बेस व्हेरिएंट होते जे आता discontinue करण्यात आले आहे. ४५०x बेस मध्ये रेंज १०५ किमी मिळते पण फीचर्स आणि चार्जिंग टाइम कमी मिळतो पण जर तुम्ही प्रो मॉडेल घेतले तर मात्र रेंज १०५ किमी च मिळते पण तुम्हाला सर्व फीचर्स दिले जातात. आता कंपनी एस हे मॉडेल लाँच करत आहे. हे मॉडेल ४५०x बेस च्या खालचे मॉडेल असणार आहे. असे जरी असले तरी ग्राहकांना जबरदस्त package मिळणार आहे.

वाचा – स्वस्त ओला इ स्कूटर खरेदी करण्याची शेवटची संधी, १० हजार वाचवायचे असतील तर वाचा..!

वाचा – ओकिनावा ने केली नवीन गाडी लाँच मिळणार २२ हजार सबसिडी…! वाचा संपूर्ण

Ather 450s काय असतील फीचर्स 

अथर ने मार्च २०२३ रोजी 450S या मॉडेल च्या रजिस्ट्रेशन साठी apply केलेआहे. 450S ऍक्टिवा आणि ज्युपिटर यांच्या किमती शी match करण्यासाठी आणि ओला s १ एअर ला टक्कर देण्यासाठी बनवण्यात आले आहे. या गाडी मध्ये कॉस्ट कमी करण्यासाठी अलुमिनिम फ्रेम ऐवजी स्टील ट्यूब फ्रेम दिली जाणार आहे. अलुमिनिम फ्रेम दणकट आणि लाइटवेट असते ज्याने रेंज चांगली मिळते आणि गाडीची लाईफ वाढते.

पण स्टील tube सुद्धा चांगली असते ऍक्टिवा आणि ज्युपिटर मध्ये ट्यूब फ्रेमचा वापर केला जातो. s मोडलं मध्ये ग्रे स्केल डिस्प्ले मिळणार आहे. पाठीमागे ड्रम ब्रेक आणि पुढे डिस्क दिला जाईल. . मोटर हि ac pmsm ऐवजी bldc use केली जाईल ज्याने टॉप स्पीड तेवढाच मिळेल पन पॉवर कमी असेल टॉर्क कमी असेल. गाडीत बाकी कितीही कॉस्ट कटिंग केली तरी गाडीची किंमत जास्त काम होत जितकी बॅटरी मध्ये केल्यावर होते म्हणूनच अथर ने ४५०s या मॉडेल मध्ये 3.7 kWh ऐवजी २.९ kWh बॅटरी पॅक दिला जाईल जो gen २ प्रमाणे ८५ ते ९० कमी रेंज प्रदान करेल.

चार्जिंग साठी बेसिक चार्जर दिला जाईल जो ८ तासात गाडी चार्ज करेल आणि फास्ट चार्ज यामध्ये दिले जाणार नाही या ऐवजी ७५० वॅट चार्जर चा option दिला जाईल ज्याने गाडी ५ तासात चार्ज होईल. या सर्व गोष्टींची कॉस्ट कमी केल्याने अथर ४५०s ची किंमत कमालीची कमी होईल आणि तुम्हाला व रॉड हि गाडी ९० ते ९५ हजारांच्या आत बसेल. जर महाराष्ट्रत पुन्हा सबसिडी सुरु झाली तर हि गाडी ८० हजारांत मिळेल.

वाचा – १ लाखांत ई स्कूटर घेण्यासाठी ओला इलेकट्रीकच्या शोरूम समोर ग्राहकांच्या रांगा..!

अथर सारखा प्रीमियम ब्रँड मार्केट मध्ये भविष्यात येणाऱ्या सिम्पल वन, होंडा, सुझुकी, यामाहा आणि गोगोरो यांच्या वाहनांना टक्कर देण्यासाठी आणि सध्या बजेट मार्केट ला एक प्रॉडक्ट उपलब्ध करण्यासाठी हे पाऊल टाकत आहे.

Leave a Comment