सर्व ब्रँडेड ई-स्कूटर च्या महाराष्ट्रातील ऑन रोड किमती किती? जाणून घ्या

Electric scooter price list in Maharashtra – भारत सरकारने फेम २ सबसिडी कमी केली आहे त्यामुळे १ जून २०२३ नंतर सर्व इलेकट्रीक गाड्यांच्या किमती २० ते ३० हजार रुपयांनी वाढल्या आहेत. कोणत्या इलेकट्रीक गाडीची पुणे, मुंबई, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर, संभाजी नगर, लातूर, नागपूर, अकोला, बीड आणि धुळे या सह संपूर्ण महाराष्ट्रात किती ऑन रोड किंमत वाढली आहे हेच सांगण्यासाठी हा लेख.  आजच्या टॉप लिस्ट मध्ये ४ कंपन्या निवडल्या आहेत यामध्ये ओला, अथर, टीव्हीएस आणि बजाज यांची निवड केली आहे. या कंपन्यांच्या वाहनांची ची सर्वात जास्त चर्चा आणि मागणी आहे.   

मे २०२३ मध्ये तुफान विक्री या इलेकट्रीक वाहनांची झाली आहे. जेवढा सेल दिवाळी किंवा दसऱ्याला होत नाही तेवढा या मे महिन्यात झाला आहे. कारण हि तस होत, फेम २ सबसिडी कमी होणार होती.  

१ जून २०२३ नंतर किमती.  

हि टॉप ४ ची लिस्ट मी यादृच्छिकपणे तयार केली आहे. टॉप १ म्हणजे चांगली आणि टॉप ४ म्हणजे खराब असे काही नाही.  

१. बजाज चेतक –  

बजाज चेतक सध्या महाराष्ट्रात प्रगती करत आहे. डिजाईन आणि स्टील बिल्ड मुळे प्रत्येक जण हि गाडी आवडीने घ्यायला तयार असतो. स्पेसिफिकेशन्स नुसार या गाडीमध्ये  4.2 किलो वॅट ची PMSमोटर दिली आहे यामुळे ७० किमी चा टॉप स्पीड मिळतो. ६० ah म्हणजे ३ किलो वॅटh  पर्यंत चा लिथियम आयन एनएमसी बॅटरी पॅक दिला आहे ज्याने ९० किमी ची रिअल रेंज मिळते. २ राईड आणि १ रिव्हर्स मोड दिला आहे. आयपी ६७ वॉटर आणि डस्ट रेजिस्टन्स सर्टिफिकेशन दिले आहे. ब्लॅक अँड व्हाईट डिस्प्ले आणि दोन्ही चाकाला ड्रम ब्रेक दिला आहे. हि गाडी सध्या महाराष्ट्रात किती ऑन रोड किमतीला उपलब्ध आहे.  

सध्या १,६५,६०६/- एक्स शोरूम किंमत आहे. यात आता २२,५०० फेम २ सबसिडी दिली जाते जी पहिली ४३,५०० रुपये होती. बजाज ला महाराष्ट्र सरकार १० हजार सबसिडी देते. इन्शुरन्स ६,८०२ रुपये आणि आरटीओ चार्जेस २५० असे मिळून रोड गाडीची किंमत १,४०,१५८/- इतकी झाली आहे. या आधी हीच किंमत १ लाख १७ हजार इतकी होती. म्हणजे अंदाजे २३००० रुपये किंमत वाढली आहे. आजच्या तारखेला video बनवते वेळी बजाज चेतक  १,४०,१५८/- च्या किमतीला मिळू शकते.  

२. अथर ४५०x –

Ather Energy सध्या योग्य रेंज सांगण्यात आणि फास्ट चार्जिंग च्या उपलब्धतेत सगळ्यात रिलायबल ब्रँड आहे. यांच्या ४५०x मध्ये नॉर्मल आणि प्रो असे व्हेरिएंट आहेत. दोन्ही  मध्ये फक्त सॉफ्टवर चा फरक आहे. रेंज आणि स्पेक्स सेम आहेत. ४५०x मध्ये ६.४ किलो वॅट ची PMSमोटर दिली जाते. टॉप स्पीड ९० किमी इतका आहे. ३.7 किलो वॅटh लिथियम आयन  एनएमसी बॅटरी पॅक दिला आहे. रेंज १०५ रिअल मध्ये मिळते. प्रो पॅक मध्ये ४ रायडींग मोडस आणि १ रिव्हर्स मोड दिला जातो. गाडीला आयपी ६७ रेटिंग दिले आहे.  

सध्या गाडीची ex  शोरूम किंमत  १,६७,५६३/- रुपये असून यामध्ये २२,४८५ रुपये फेम २ सबसिडी दिली जाते. त्यानंतरइफ्फेक्टिव किंमत होते १,४५,०७८ रुपये. यामध्ये आरटीओ चे २५० रुपये. इन्शुरन्स ७,५१३ रुपये. असे मिळून नॉर्मल गाडीची व रोड किंमत होते १,५२,८४१/- जर प्रो मॉडेल घेतले तर त्याची किंमत २०,५१८ रुपयांनी वाढते म्हणजे प्रो मॉडेल तुमहाला मिळेल १,७३,३५९/- ऑन रोड किमतीत. जुनी किंमत होती या गाडीची १ लोख ४७ हजार. म्हणजे ४५०.x  २० ते ३० हजारांनी महाग झाली. निराश नका होऊ तुमच्या साठी कंपनीने खास अपडेट्स ४५०x  नॉर्मल मॉडेल मध्ये केले आहेत ज्याने ती गाडी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. ather 450s सुद्धा लाँच होणार आहे. नुकतीच त्याची झलक वेबसाईट वर पाहायला मिळाली आहे.

३. टीव्हीएस आयक्युब

सस्पेन्शन आणि राईड क्वालिटी साठी टीव्हीएस आयक्युब ग्राहक पसंत करतात. आयक्युब मध्ये बेस आणि एस असे २ मॉडेल्स आहेत. एसटी भविष्यात येईल का नाही हे माहिती नाही नाही. सध्या दोन्ही व्हेरिएंट मध्ये ३ किलो वॅट BLDC हब मौन्टेड मोटर दिली जाते.  

७८ किमी टॉप स्पीड आणि २ रिडींग मोडस व १ रिव्हर्स मोड दिला आहे. ३.०४ किलो वॅटh चा लिथियम आयन एनएमसी बॅटरी पॅक दिला आहे. कंपनी नुसार इको मोडला १०० आणि पॉवर मोड ला ७५ किमी रेंज मिळते. आयपी ६७ रेटिंग आयक्युब ला मिळाले आहे. पुढे डिस्क आणि पाठीमागे ड्रम ब्रेक दिला आहे.  

टीव्हीएस आयक्युब च्या दोन्ही मॉडेल ची सध्या एक्स शोरूम किंमत आहे १,७०,०१७ रुपये यामध्ये २२,५०० पर्यंत फेम सबसिडी मिळेल. त्या नंतर इफ्फेक्टिव्ह किंमत  होते १,४७,५१७ रुएए या मध्येसेस चार्जेस ४०० रुपये.स्मार्ट कार्ड चार्जेस २५८ रुपये, इन्शुरन्स ५१०५ रुपये, हँडलिंग ५०० रुपये हे सर्व मिळून बेस मॉडेल ची १,५३,०७८ रुपये ऑन  रोड किंमत होते. आणि एस मॉडेल मध्ये ९४४० रुपये सॉ अपग्रेड चे द्यावे लागतात त्यामुळे ऑन रोड १,६२,५१८ रुपये किंमत होते . या किमती मध्ये थोडे फार इकडे तिकडे होऊ शकते पण जास्त नाही.  

४. ओला एस१ सिरीज

सध्या मार्केट मध्ये सर्वात जास्त फीचर्स देणारी आणि स्टायलिष्ट स्कूटर ओला आहे. कंपनीकडे एस १, एस १ प्रो & एअर असे ३ डिफरंट कॅटेगरी च्या स्कूटर प्रत्येक ग्राहकाच्या आवश्यकते नुसार उपलब्ध आहेत. हेच कारण कंपनीला टॉप पोजिशन वर स्टिक करते. एस १ प्रो मॉडेल मध्ये ८.५ किलो वॅट मिड ड्राइव्ह मोटर, ११६ किमी टॉप स्पीड. ४ किलो वॅट एनएमसी लिथियम अयान बॅटरी यामुळे १३५ किमी रेंज मिळते. ४ रायडींग मोडस आणि १ रिव्हर्स मोड दिला जातो. डिस्प्ले मध्ये नेव्हिगेशन. थीम्स. स्पीकर्स. क्रूज कंट्रोल असे फीचर्स आहेत. दोन्ही साईडला डिस्क ब्रेक दिलेला आहे.  

एस १ प्रो ची एक्स किंमत सध्या १,६२,४४३ रुपये आहे. २२,४४४ रुपये फेम सबसिडी मिळते. या नंतर १,३९,९९९ effective ex शोरूम किंमत होते. यामध्ये २५० आरटीओ, हेल्मेट १२९९. इन्शुरन्स १०,८८७. हँडलिंग चार्जेस २८८८ रुपये हे सगळे ऍड करून व रोड किंमत होते १,५५,३२३ रुपये. इतके पैसे तुम्हाला द्यावे लागतील. यात केअर प्लॅन आणि एक्सटेंडेड वॉररंटी ऍड केली तर अजून वाढतील.  

एस १ मॉडेल मध्ये ८.५ किलो वॅट मिड डाईव्ह मोटर दिली जाते पण हायपर मोड नसल्याने टॉप स्पीड ९५ किमी  इतका आहे. ३ रायडींग मोडस दिले आहेत आणि एक रिव्हर्स. ३ किलो वॅट एनएमसी लिथियम आयन बॅटरी मुळे १०२ किमी रेंज मिळते. या गाडीत सुद्धा डिस्प्ले मध्ये नेव्हिगेशन. themes. स्पीकर्स. क्रूज कंट्रोल असे फीचर्स आहेत. दोन्ही साईडला डिस्क ब्रेक दिलेला आहे.  

एस १ ची १ जून २०२३ नंतर एक्स शोरूम किंमत १,५१,९१५ रुपये आहे. यातून २१,९१६ रुपये फेम सबसिडी वजा केल्यावर एफ्फेक्टिव्ह किंमत होते १,२९,९९९ रुपये एक्स शोरूम. यामध्ये २५० आरटीओ, हेल्मेट १२९९. इन्शुरन्स १०,७२७. हँडलिंग चार्जेस २८८८ रुपये हे सगळे ऍड करून व रोड किंमत होते १,४५,१६२ रुपये. इतके पैसे तुम्हाला द्यावे लागतील. यात केअर प्लॅन आणि एक्सटेंडेड वॉररंटी ऍड केली तर अजून वाढतील.  

कोणती गाडी व्हॅल्यू फॉर मनी?

जर एक फ्युचर प्रूफ गाडी घ्यायची असेल तर त्यामध्ये व्हर्सटाईल डॅशबोर्ड असावा म्हणजे भविष्यात रॅम, प्रोसेसर वाढवता यावा. फास्ट चार्जिंग सुदधा असावे. फास्ट चार्ज का असावे तर. सरकार येत्या ७ ते १० वर्ष्यात २ व्हिलर पेट्रोल वाहनांना पूर्ण पणे बॅन करणार आहे. त्यामुळे तुम्ही भविष्यात पेट्रोल गाडी वापरू शकनार नाही ज्याने जास्त डिस्टन्स इव्ही नेच प्रवास करावा लागणार आहे. अश्या वेळेस फास्ट चार्जर उपयोगी येईल. मेंटेनन्स स्वस्त असावा ज्याने भविष्यात लॉन्ग टर्म साठी खर्चिक असू नये. या सर्व गोष्टी कोणत्या गाडीत आहेत त्याचा तुम्ही विचार करा आणि कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जय महाराष्ट्र.  

Leave a Comment