Electric Thar: १५ ऑगस्ट ला बॅटरी वर चालणारी महिंद्रा ई थार येणार; खुद्द कंपनीने दिली माहिती

Mahindra electric thar: महिंद्रा अँड महिंद्रा आपल्या प्रत्येक वाहनाला इलेकट्रीक अवतारात लाँच करण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे. कंपनी इलेकट्रीक टेक्नोलोंजि ला चालना देण्यासाठी आपले प्रत्येक वाहन हे ई अवतारात लाँच करणार आहे आणि यामध्ये महिंद्राची थार इलेकट्रीक अवतारात येणार असल्याचे खुद्द कंपनीने सोशल मीडिया द्वारे माहिती दिली आहे. कार उत्पादक कंपनी महिंद्रा ने थार या लोकप्रिय ऑफ रोड एसयूव्ही ला इलेकट्रीक व्हर्जन मध्ये आधीच कन्व्हर्ट केले आहे. कंपनीने अलीकडेच आपल्या प्रसिद्ध ऑफरोडिंग एसयूव्ही थारची परवडणारी रिअल व्हील ड्राइव्ह (RWD) आवृत्ती सादर केली आहे, आता ती त्याची इलेक्ट्रिक आवृत्ती आणण्याच्या तयारीत आहे. कंपनी 15 ऑगस्ट 2023 रोजी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरातून थार इलेक्ट्रिक जगासमोर सादर करेल.

source: mahindra twitter handle

महिंद्रा थार च्या इलेकट्रीक अवताराचे नाव

महिंद्राने आपल्या ट्विटर या सोशल मीडिया अकॉउंट द्वारे छोटासा विडिओ प्रसारित करत इलेकट्रीक थार ची छोटी शी झलक जगाला दाखवली आहे. १८ सेकंदाच्या विडिओ मध्ये नवीन तंत्रज्ञानाने सुसज्ज आणि फ़ुटूरिस्टीक ई थार चे हेडलॅम्प दाखवत नाव उजेडात आणले आहे. कंपनीने महिंद्रा थार च्या इलेकट्रीक अवताराचे नाव “Thar.e” असे ठेवले आहे. कंपनी थार इलेक्ट्रिकला सर्व-नवीन आणि डेडिकेटेड इलेक्ट्रिक स्केटबोर्डवर तयार करेल.

THAR ची वैशिष्ट्ये काय आहेत

THAR.e च्या छोट्याश्या विडिओ मध्ये चौकोनी आकाराच्या एलईडी हेडलॅम्प्स दाखवल्या आहेत. या हेडलॅम्प चा स्ट्रक्चर पिक्सल आकाराचा असून हीच कॉन्सेप्ट कंपनीने या आधी पिक-अप कॉन्सेप्ट मध्ये दाखवली होती. महिंद्रा थार – ई हि गाडी बॉर्न इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मवर बनवत आहे, ज्यावर आणखी अनेक इलेक्ट्रिक मॉडेल्स डेव्हलोप केले ज्याण्याची शक्यता आहे.

महिंद्रा BE आणि XUV.e मालिका देखील सादर करू शकते

THAR.e मुळे महिंद्राला त्याची SUV केवळ एकंदर बाजारपेठेपुरती मर्यादित न ठेवता जागतिक मॉडेल म्हणून स्थान देण्यात मदत होईल. यासह, महिंद्राचे नवीन INGLO EV प्लॅटफॉर्म भविष्यातील इलेक्ट्रिक वाहनांच्या BE आणि XUV.e मालिकेसोबत शेअर केले जाण्याची शक्यता आहे.

नॉर्मल Thar च्या फ्रेम वर इलेकट्रीक कन्व्हर्जन

महिंद्रा थार ला एक मजबूत लैडर फ्रेम चेसिस मिळते. लैडर फ्रेम चेसिस सह गाडीला इलेकट्रीक मध्ये कन्व्हर्ट करणे कंपनी साठी खूप अवघड असेल  अशक्य नाही. या व्यतिरिक्त वजन आणि जागेच्या बाबतीत, थारला सध्याच्या लैडर फ्रेम मध्ये जास्त संघर्ष करावा लागणार आहे.

देशातील पहिली इलेक्ट्रिक लाइफस्टाइल SUV 

Mahindra THAR.e च्या ड्रायव्हिंग रेंज किंवा इतर वैशिष्ट्यांबद्दल काहीही सांगता येत नाही मात्र यातून चांगली कॅटेगरी अपेक्षित आहे. जेव्हा इलेकट्रीक थार  भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली जाईल तेव्हा ती देशातील पहिली इलेक्ट्रिक जीवनशैली eSUV असेल अशी अपेक्षा आहे. आता थार इलेक्ट्रिकशी संबंधित इतर माहिती भारतात सादर केल्यानंतरच समोर येईल.

Leave a Comment